मुस्लिम कुटुंबाने मुलाचे नाव ठेवले नरेंद्र मोदी

    दिनांक  25-May-2019
लखनौ : २३ मेला मजमोजणीच्या दिवशी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला ऐतिहासिक यश मिळत असताना उत्तरप्रदेशच्या गोंडा शहरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. हे कुटुंब मोदी यांचे चाहते असल्याने आणि हा बालक मोदींच्या विजयोत्सवाचा साक्षीदार ठरला असल्याने या कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र मोदीअसे ठेवण्यात आले.

 

मुस्लिम कुटुंबातील या बालकाचा जन्म २३ मे रोजी झाला. याच दिवशी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मोदी विक्रमी विजयाच्या दिशेने वाटचाल करीत होते. त्यामुळे या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवून, या कुटुंबाने नरेंद्र मोदी यांच्याप्रती आपले प्रेम प्रकट करतानाच, सर्वधर्मसमभावाचे आगळे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. मिनाज बेगम असे या बालकाच्या आईचे नाव आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat