ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी घेतले आडवाणींचे आशीर्वाद

    दिनांक  24-May-2019नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींचे आशीर्वाद घेतले. आज सकाळी आडवाणींच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदी व शाह यांनी आडवाणींनीची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचीही भेट घेतली.


आडवाणींची भेट घेतल्यानंतर मोदींची ट्विट करत, भाजपचे आजचे यश हे केवळ लालकृष्ण आडवाणींसारख्या नेत्यांच्या कठोर मेहनतीमुळे शक्य झाले. या ज्येष्ठ नेत्यांनी मागील अनेक दशके पक्ष बळकट करण्यावर भर देऊन पक्षाला एक दिशा दिल्याचे सांगितले.


जोशी यांची भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले, डॉ. मुरली मनोहर जोशी एक बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीसाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज सकाळी त्यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे मोदी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat