'मेन इन ब्लॅक' मध्ये सानिया आणि सिद्धांत चतुर्वेदीचा सहभाग

24 May 2019 14:21:49



दंगल फेम सानिया मल्होत्रा आणि आणि नुकतेच गली बॉय या चित्रपटात झळकलेले सिद्धांत चतुर्वेदी हे दोघेही 'मेन इन ब्लॅक' या प्रसिद्ध चित्रपटांच्या शृंखलेतील आगामी चित्रपटाचा एक भाग असणार आहेत. आवाज ही माणसाची एक अनोखी ओळख आहे. याच आवाजाच्या माध्यमातून हे दोघे चित्रपटात आपली कामगिरी दर्शवणार आहेत. 


'मेन इन ब्लॅक' च्या हिंदी माध्यमातील चित्रपटामध्ये क्रिस हेम्सवर्थ आणि टेसा थोम्पसन या भूमिकांना या दोघांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. या नव्या मेन इन ब्लॅक मध्ये २ नवीन भूमिकांची भर पडणार आहे. आता त्या भूमिका काय आहेत याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.

या चित्रपटाविषयी बोलताना सिद्धांत चतुर्वेदी याने हा चित्रपट लहानपणापासून पाहत असल्याचे आणि आता त्यामध्ये सहभागी होता आले याविषयी आनंद व्यक्त केला तर सानिया मल्होत्राने देखील या सिरीजची खूप मोठी फॅन असल्याचे सांगत चित्रपटामध्ये आवाज देण्याचा अनुभव अतिशय आव्हानात्मक आणि उत्साहपूर्ण असल्याचे म्हटले.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0