२०२० पर्यंत सर्वांना हक्काचे घर : रियल इस्टेट क्षेत्राचा मोदींवर विश्वास

    दिनांक  24-May-2019
मुंबई : लोकसभा निवडणूकांनंतर भाजपला दुसऱ्यांदा मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल रियल इस्टेट क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेची मुदत आता २०२० पर्यंत वाढवली आहे. त्यानंतर मोदी सरकार प्रत्येकाला हक्काचे घर देणार असून या क्षेत्रात नोकऱ्याही उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्राची शिखर संस्था असलेली कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनने (क्रेडाई) भाजपचे अभिनंदन केले आहे.

 

"भाजप सरकार सत्तेत आल्यास बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान देईल, यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी वेगाने उभी राहण्यास मदत होईल. भाजप सरकारने रेरा कायदा, नोटाबंदी, जीएसटी आदी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यानंतरही भाजपला संपूर्ण बहुमत मिळण्यास मदत झाली आहे. २०२० पर्यंत आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे उपलब्ध होतील, असा आम्हाला विश्वास आहे.'', असे मत क्रेडाईचे अध्यक्ष जेकब शाह यांनी व्यक्त केले.

 

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे (NARDECO) राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी एनडीएचे अभिनंदन करत मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकार २.० यांच्याकडून गेल्या पाच वर्षांत सुरू करण्य़ात योजनांची व्याप्ती आणखी वाढावी, असे त्यांनी म्हटले आहे. हिरानंदानी म्हणाले, "सरकारने बांधकाम क्षेत्रासह गृहनिर्माण क्षेत्रात विस्तार करण्यासाठी काम करणार आहे." एनरॉक प्रोपर्टी रिअल इस्टेटचे अध्यक्ष अनुज पूरी म्हणाले, "रिअल इस्टेट क्षेत्र हे पुन्हा विकास करेल, २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या पाच वर्षांत हे शक्य होईल, असा आम्हाला विश्वास आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat