नोलानच्या 'टेनेट' मध्ये डिंपल कपाडिया भूमिका साकारणार

24 May 2019 12:07:45

 

 
 
ख्रिस्तोफर नोलान हा जगातील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक समजला जातो. आता सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी भारतात आला असून डिंपल कपाडिया ही भारतातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. 'टेनेट' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

वोर्नर ब्रोस ही जगातील एक नावाजलेली निर्मिती संस्था या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ऍरॉन टेलर, मायकल केन, केनेथ, जॉन वॊशिंग्टन, रॉबर्ट पॅटिन्सन आणि एलिझाबेथ डेबिकी यांसारखे प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे नाव देखील नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

इंटरस्टेलर सारखी साय-फाय जॉनरमधील चित्रपट प्रभावीपणे साकारल्यावर आता 'टेनेट' हा चित्रपट एका आंतरराष्ट्रीय गुप्तचर विभागाशी संबंधित कथेवर आधारलेला असून या चित्रपटाचे चित्रीकरण तब्ब्ल ७ देशांमध्ये करण्यात आले आहे. हा चित्रपट १७ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0