मोदी सरकार पुन्हा एकदा बाजी मारणार का?

    दिनांक  23-May-2019


आज सकाळपासून मतदानाची आकडेवारी समोर येत असताना भारताच्या पंतप्रधानपदी कोण बसणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातली आकडेवारी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. २८४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल की मोदी ही चर्चा सर्व देशात रंगत असताना हळूहळू चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातून पंतप्रधानपदासाठी लढत असून राहुल गांधी अमेठीमधून लढत आहेत. एनडीए सध्या आघाडीवर असून युपीए सध्या पिछाडीवर असल्याची चिन्हे दिसत आहेत.

उत्तर प्रदेशातून अमेठी मधून राहुल गांधी यांच्याविरुद्ध स्मृती इराणी यांची लढत रंगात असताना स्मृती इराणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.