इतिहासात प्रथमच : बिगरकॉंग्रेसी सरकारला दुसऱ्यांदा बहुमत

    दिनांक  23-May-2019


 


नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्यांदाच कॉंग्रेस वगळता संपूर्ण देशभरात इतर पक्षाला दुसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. भाजपने आपल्या अभूतपूर्व विजयाची जल्लोषात तयारी केली आहे. देशात एडीएचा पंतप्रधान बनणार हे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे.

 

यांनी लिहीली भाजपच्या विजयाची गाथा

भाजपच्या विजयाची गाथा लिहीणारे पक्षाध्यक्ष अमित शाह गांधीनगर या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघातून त्यांनी प्रचंड मतांनी आघाडी घेतली आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदी यांनीही आघाडी घेतली आहे. अमेठीतून स्मृती इराणी राहुल गांधींना कडवी झुंझ देत आहेत.

 

सरकार निवडण्यात यांची महत्वाची भूमिका

भाजपला स्वबळावर संपूर्ण बहुमत मिळत आहे. त्यांच्या विजयाची गाथा पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, तेलंगाना आदी राज्यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. बिहारमध्ये महाआघाडीने भाजपला रोखण्यात काहीसा प्रयत्न केला आहे.ममता दिदींचा किल्ला भेदला

उत्तरप्रदेशमध्येही बसप-सप या पक्षांनी केलेल्या आघाडीमुळे काही जागांवर भाजपला नुकसान झाले आहे. मात्र, भाजपला अपेक्षेप्रमाणे सर्वात जास्त फाय़दा पश्चिम बंगालमध्ये झाला. लोकसभा निवडणूकीत प्रचंड हिंसाचार झाला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रचारसभा आणि रॅलीला रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, अखेर भाजपने या ठिकाणी २३ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.

 

बिहारमध्ये महागठबंधनची हार

बिहारमध्ये भाजपने नीतीश किमार यांच्याशी युती केल्यानंतर त्याचे परिणाम आता स्पष्ट झाले आहेत. कॉंग्रेससह महाआघाडीतील कोणत्याही पक्षाला आपला करिश्मा दाखवता आलेला नाही. हरीयाणा आणि कर्नाटकात भाजपला फायदा झाला आहे.

 

पुर्वेकडील राज्यांमध्येही कमळ

पुर्वेकडील राज्यांमध्येही भाजपने कमळ फुलवले आहे. आसाममध्ये दोन ते तीन जागांवर भाजपला यश मिळेल, अशी स्थिती आहे. येथे भाजपने प्रत्येक बुथवर मेहनत घेतली होती. आसाम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची फळी दिवसरात्र यासाठी तैनात होती.

 

फिर एक बार मोदी सरकार

एक्झिट पोलनंतर देशभरात मोदी त्सुनामी कायम असल्याचे चित्र होते. विरोधी पक्षांनी यावर टीका करत हे चुकीचे अंदाज असल्याचे म्हटले होते. मात्र, आज अखेर निकालानंतर चित्र स्पष्ट होत असून भाजप प्रणित पक्षांनी पुन्हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. देशाच्या नकाशात भगवा रंग आणखी गडद होत चालला आहे. जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारला कौल दिला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat