शेकाप आमदाराची 'लोकसत्ता'च्या पत्रकारास मारहाण

    दिनांक  23-May-2019


 

 

मुंबई : लोकसभा निवडूणकीच्या निकालाची प्रक्रिया सुरू असताना रायगड मध्ये शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी 'लोकसत्ता' वृत्तपत्राच्या पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शेकापच्या पाठिंब्यानंतरही रायगडमध्ये राष्ट्रवादीचा निसटता विजय झाला. तर मावळमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला, असा प्रश्न विचारल्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी त्या पत्रकाराच्या कानशिलात लगावली. पाटील यांनी केलेल्या या मारहाणीला 'पत्रकार हल्ला कृती समिती'ने विरोध दर्शविला आहे.

रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांना शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पाठिंबा दिला होता. मात्र रायगड मध्ये तटकरे यांचा निसटता विजय झाला. तर मावळमध्ये पार्थ पवार यांच्या दारूण पराभव झाल्याने शेकापची अडीच लाख मते कुठे गेली ? असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्याकडे गेलेले 'लोकसत्ता'चे अलिबागचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना त्यांच्याकडून मारहाण झाली. अडीच लाख मतांचा प्रश्न विचारताच क्षणी संतापलेल्या पाटील यांनी कशाळकर यांच्या कानशिलात लगावली. काय वाट्टेल त्या बातम्या छापता काय, असे म्हणत कशाळकर यांना मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार मतमोजणी केंद्रात पोलिसांसमोरच घडला. घडलेल्या या संपूर्ण प्रकाराचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat