Live Updates: जाणून घ्या देशभरातील सर्व निकाल एकाच ठिकाणी

    दिनांक  23-May-2019


मुंबई : संपूर्ण देशाचेच नव्हे, तर जगाचेही लक्ष असलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचा कल भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या बाजूने दिसून येत आहे. यात काही धक्कादायक निकाल समोर येत असून हे सर्व अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील.

 

*  दिल्ली मतदार संघातून गौतम गंभीर, मीनाक्षी लेखी, मनीष तिवारी आघाडीवर, आम आदमी पार्टी साफ

*  अखिलेश यादव यांची विजयाच्या दिशेने वाटचाल

*  जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्ती पिछाडीवर

 
* दमण आणि दीवमध्ये भाजपचे लालूभाई पटेल आघाडीवर ; काँग्रेसचे केतन पटेल २५०० मतांनी पिछाडीवर
 
* दादरा नगर हवेलीमध्ये अपेक्षा उमेदवार संजीभाई दलकर आघाडीवर तर भाजपचे गोमनभाई पटेल यांच्यामध्ये ६५२ मतांचा फरक
 
* लक्षद्वीपमध्ये काँग्रेसचे हमदुल्लाह सईद आणि राष्ट्रवादीचे मोहम्मद फैझल यांच्यामध्ये ३०० मतांचा फरक
 
 
 
* कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर 
 
  
* कर्नाटकमध्ये जेडी(एस)चे कुमारसवामी मंड्या लोकसभा मतदार संघातून आघाडीवर
 
 
* आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरसीपी ३५ जागांवर आघाडीवर असून तेलगू देशम पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहेत ; एकूण १७५ मतदारसंघ
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat