LIVE Update : मराठवाड्यात दानवे-मुंडेंचा करिष्मा

    दिनांक  23-May-2019


 


बीड : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याचा गड राखला आहे. मराठवाड्यातील ८ जागांपैकी ७ जागेवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला आहे. बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणीमध्ये भाजप-शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे. तर औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे व एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील आघाडीवर आहेत.

 

बीड मधून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे, जालन्यामधून रावसाहेब दानवे, लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे, उस्मानाबादमधून शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर, हिंगोलीमधून सेनेचे हेमंत पाटील, परभणीमधून सेनेचे संजय जाधव व नांदेडमधून भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे आघाडीवर असून चिखलीकर हे अशोक चव्हाण यांना पराभूत करून जायंट किलर ठरण्याची शक्याता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat