Live Update : खान्देश पुन्हा एकदा भाजपचाच!

    दिनांक  23-May-2019
जळगाव : खान्देशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या आघाडीवर असून जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. यासोबतच धुळे व नंदुरबारमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

 

रावेर

 

रावेर मधून भाजपच्या रक्षा खडसे व काँग्रेसचे डॉ.उल्हास पाटील यांच्यात थेट लढत असून रक्षा खडसे या ९२ हजार ३९८ मतांनी आघाडीवर आहेत. रक्षा खडसे यांना २ लाख १४४ मते मिळाली असून पाटील यांना १ लाख १३ हजार ७४६ मते मिळाली आहेत.

 

जळगांव

 

जळगांव मतदार संघातून भाजपचे उन्मेष पाटील आघाडीवर असून पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत आहे. उन्मेष पाटील हे १ लाख २ हजार ४७४ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख ६६ हजार १३९ मते मिळाली असून देवकर यांना अवघी ६३ हजार ६६५ मते मिळाली आहेत.

 

धुळे

 

धुळे मतदार संघातून भाजपचे डॉ.सुभाष भामरे आघाडीवर असून भामरे व काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात थेट लढत आहे. डॉ. भामरे हे ७५ हजार ८०६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख ५७ हजार २९९ मते मिळाली असून पाटील यांना अवघी ८९ हजार ४६२ मते मिळाली आहेत.

 

नंदुरबार

 

नंदुरबार मतदार संघातून भाजपच्या डॉ. हिना गावित या आघाडीवर असून गावित व काँग्रेसचे के.सी.पाडवी यांच्यात थेट लढत आहे. डॉ. गावित हे १५ हजार ४७२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ३ लाख २३ हजार १६९ मते मिळाली असून पाडवी यांना ३ लाख २३ हजार १६९ मते मिळाली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat