Live Updates : 'नमो अगेन' देशाने दिला मोदींच्या बाजूने कौल

    दिनांक  23-May-2019
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचेच नव्हे, तर जगाचेही लक्ष असलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कौल समोर आले आहेत. यात भाजपाप्रणित एनडीए सरकारला पुन्हा एकदा सरकार स्थापनेची संधी मिळणार असल्याचे समोर आले आहेत. मोदी सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कामगिरीवर देशातील जनता खुश असल्याचे दिसून येत आले.

 

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप २६४ जागांवर आघाडीवर असून भाजपाप्रणित एनडीए ३१२ जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस ७१ जागांवर पुढे असून काँग्रेसप्रणित यूपीए १०८ जागांवर पुढे असल्याचे पाहायला मिळत आहेत.

 

महाराष्ट्रातही भाजप व शिवसेना आघाडीवर असून एनडीए ४१ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप २२ व शिवसेना १९ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पाच, काँग्रेस व वंचित आघाडी एका जागेवर आघाडीवर आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat