LIVE Update : नांदेड, औरंगाबादमध्ये सत्ता पालट?

    दिनांक  23-May-2019औरंगाबाद : लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणी सुरु असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेडमध्येही हेच चित्र पाहायला मिळत असून औरंगाबादमधून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून धक्का बसला आहे. खैरे हे ३४ हजार ५६ मतांनी पिछाडीवर असून अशोक चव्हाण हे २५ हजार २१७ मतांनी पिछाडीवर आहेत.

 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे व एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील ३४ हजार ५६ मतांनी आघाडीवर आहेत. जलील यांना १ लाख ७५ हजार ९१९ मते मिळाली आहेत. तर खैरे यांना १ हजार ४१ हजार ८६३ मते मिळाली आहेत. तर रावसाहेब दानवे यांचे जावई अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना १ लाख २७ हजार ८०० मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे नांदेड लोकसभा मतदार संघात अशोक चव्हाण यांना धोबीपछाड करत भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २ लाख ७६ हजार ६४५ मते मिळाली असून चव्हाण यांना २ लाख ५३ हजार ७ मते मिळाली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat