हा धर्माचा अधर्मावर विजय : साध्वी प्रज्ञा सिंह

    दिनांक  23-May-2019


भोपाळ : लोकसभा मतदानासंदर्भातील निकालांची आकडेवारी दुपारनंतर स्पष्ट होत आहे. भोपाळ मतदार संघातून भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिग्विजय सिंह यांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.

 

दरम्यान यावर साध्वी प्रज्ञा यांनी पहिल्यांदा प्रतिक्रीया दिली आहे. 'माझ्या विजयामुळे धर्माचा विजय होणार आणि अधर्माचा नाश होणार आहे', असे त्या म्हणाल्या. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळच्या मतदारांचे आभार मानले आहेत.
भोपाळ मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर या काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात लढत आहेत.

 

देशातील मतदानाच्या निकालाचे कल हाती आल्यावर प्रज्ञा सिंह सुमारे ७० हजार मतांनी पुढे असल्याचे चित्र आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रज्ञा सिंह म्हणाल्या, 'मी जिंकणार हे निश्चित आहे. माझा विजय हा धर्माचा विजय असेल. माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल. भोपाळच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat