तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव टीआरएसला यांच्या यश

    दिनांक  23-May-2019हैद्राबाद : तेलंगणामध्ये अपेक्षित निकालाची चर्चा आहे. यामध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला यश मिळाले. टीआरएसला लोकसभेमध्ये १७ जागांपैकी ८ जागांवर आघाडीवर आहेत. तर, भाजप आणि काँग्रेस हे प्रत्येकी ४ जगावर आघाडीवर आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला ११ जागा मिळाल्या होत्या.

 

१९९९मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी टीडीपीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नव्हतं. के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचं उपसभापतीपद चंद्रबाबू नायडू यांनी दिलं होतं. त्यानंतर एका वर्षानंतर के. चंद्रशेखर राव यांनी टीडीपीशी फारकत घेत तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat