अमेठीची लढत कायम राहणार स्मृतीत

23 May 2019 16:52:50


 

उत्तर प्रदेश मध्ये सगळेच दिग्गज राजकारणी आखाड्यात उतरले असताना लोकसभेत कोणाची बाजी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर आज निकालाचा दिवस असल्यामुळे मतमोजणीवरून हळूहळू कोणाचे पारडे जड याचा अंदाज लागण्यास सुरुवात झाली. शेवटी या सगळ्या चुरशीच्या लढतीनंतर जय आणि पराजय हे आलेच.

 

उत्तर प्रदेशमधील आपल्या होमग्राउंड अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष अर्थातच राहुल गांधी यांनी उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांची लढत इतकी सोपी नव्हती याचे कारण म्हणजे स्मृती इराणी यांचे आव्हान. स्मृती इराणी यांचे आव्हान म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते आणि तसेच झाले.

 

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून स्मृती इराणी आघाडीवर होत्या. मात्र फारच कमी फरक असल्यामुळे कोणाच्या बाजूने पारडे झुकेल याचा अंदाज लावणे कठीण होते. मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आल्यावर मात्र चित्र स्पष्ट झाले आणि स्मृती इराणी या १९ हजार ६९७ मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सगळ्यात स्मृती इराणी यांनी सर्वांच्या खरोखरीच स्मृतीत राहील अशी झुंज दिली असेच म्हणावे लागेल.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0