ठाण्यात भगवा फडकला

    दिनांक  23-May-2019
ठाणे : पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत गेल्यावेळेपेक्षा अधिक मताधिक्क्य मिळवत राजन विचारे विजयी झाले. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरकरांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकरिता खोटा आनंद नाकारत राजन विचारे यांच्या पारड्यात लाखोंनी मते टाकली. जितेंद्र आव्हाड यांच्या जातीय आणि धार्मिक राजकारणाला नाकारत विकासाच्या धनुष्यबाणाला मतदारांनी साथ दिली. २० व्या फेरीच्या मतमोजणीत राजन विचारे यांना २ लाख, ८२ हजारांची आघाडी मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला.

 

राजन विचारे यांच्या शिक्षणाचा मुद्दा, जातीय राजकारण व अल्पसंख्याकांच्या मतांसाठीचे धार्मिक कार्ड वापरूनही अखेर आनंद परांजपे यांना मतदारांनी नाकारले. ठाणे आणि मीरा-भाईंदरकरांनी लाखांची तर नवी मुंबईकरांनी हजारोंची आघाडी विचारे यांच्या पारड्यात टाकली.

 

राजन विचारे यांची आघाडी २ लाख, ८२ हजार, ७३६ मतांपर्यंत पोहोचली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश करत विजय साजरा करायला सुरुवात केली. भाजप कार्यालयात ठाणे पालघरमधील चारही महायुतीचे खासदार निवडून आल्याबद्दल व देशात भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याबद्दल जोरदार जल्लोश करण्यात आला. खा. कपिल पाटील, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरेंसह शहराध्यक्ष संदीप लेले व सर्व नगरसेवक भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात विजय साजरा केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat