लोकांनी दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो - शरद पवार

    दिनांक  23-May-2019


 

लोकसभा निवडणुकीतील लोकांच्या मतांचा मी स्वीकार करतो मात्र हे देखील तितकेच खरे आहे की जनतेला ईव्हीएमबद्दल शंका होत्या असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. आज सकाळपासूनच लोकसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत असताना याच निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निवडणुकीतील कामगिरीबद्दल विचारले असता प्रत्येकच वेळी जिंकणे शक्य नसते मात्र लोकांनी दिलेल्या निर्णयाचा मी स्वीकार करतो आणि या पुढे देखील लोकांसाठी जास्तीत जास्त प्रभावीपणे काय काम करता येईल याचा विचार भविष्यात पार्टी करेल आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

पुढे बोलताना राजीव गांधी यांच्या काळी देखील सरकारने चांगले काम केले होते मात्र तेव्हा कोणाला ईव्हीएम विषयी शंका निर्माण झाली नाही. तसेच अटल बिहारी वाजपेयींचे सरकार विजयी झाले त्यावेळी देखील लोकांनी हा प्रश्न उपस्थित केले नाही. मात्र आत्ता लोकांच्या मनात शंका होती असे देखील ते यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचा आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल याविषयी बोलताना दोन्हीचे राजकारण हे वेगळे असल्यामुळे याची तुलना होऊ शकत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat