Live Update: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना ८,५०० मतांची आघाडी : दिंडोरीत भारती पवार ७० हजारांनी पुढे

    दिनांक  23-May-2019
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीपासूनच गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. पहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून हेमंत गोडसेंना ६३ हजार मते मिळाली आहेत. भुजबळ यांच्या पारड्यात ४२ हजार ५३४ मते मिळाली आहेत. गोडसे हे २० हजारांनी आघाडीवर आहेत. या मतदार संघातून एकदा निवडून आलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही, असा या मतदार संघाचा अपवाद वगळता इतिहास आहे. यंदा मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल देत. विद्यमान खासदार समीर भुजबळ यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

 

दिंडोरी मतदार संघातून भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी आघाडी घेतली आहे. पवार यांना १ लाख ७६ हजार मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना १ लाख ९ हजारांवर मते मिळाली आहेत. जवळपास ७० हजारांवर पवार यांनी आघाडी घेतली आहे. भारती पवार यांनी निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतर्फे तिकीट न दिल्या जाण्याची शक्यता वाटू लागल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पवारांनी राष्ट्रवादीकजून धनराज महाले यांना तिकीट दिल्याने त्या नाराज होत्या. या जागेवर खासदार हरीशचंद्र चव्हाण यापूर्वी निवडून आले होते. मात्र, पुन्हा भाजपने पवार यांना तिकीट देऊनही आपला मतदार संघ कायम राखला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat