भारत पुन्हा विजयी ; पंतप्रधानांची प्रतिक्रिया

    दिनांक  23-May-2019


 


नवी दिल्ली : लोकसभेत भाजप आणि एनडीएच्या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "हा विजय भारताचा आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत." असे ट्विट करत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्याच बरोबर त्यांनी जगमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

 
 
 

'विरोधी पक्षांनी केलेला दुष्प्रचार, खोटे-व्यक्तिगत आरोप आणि आधारहीन राजकारण यांच्या विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल आहे.' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या आणि राष्ट्रवादाच्या राजकाणाला लोकांनी कौल दिला आहे, असंही त्यांनी सांगितले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat