शेट्टीच ‘शेर’ तर उर्मिलाचा फक्त ‘शोर’

    दिनांक  23-May-2019   

 

वो जो शोर मचाते हैं भीड़ में

भीड़ ही बनकर रह जाते हैं,

वही पाते हैं जिंदगी में कामयाबी

जो ख़ामोशी से अपना काम कर जाते हैं।

 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बाबतीत हा शेर अगदी चपखल बसतो. कारण, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसने तिकीट देऊन या मतदारसंघात रंगत भरण्याचा चांगला प्रयत्न केला असला तरी अखेरीस उर्मिलाचा प्रचार केवळ शोरठरला, तर गोपाळ शेट्टीच उत्तर मुंबईचे शेरठरले. तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी गोपाळ शेट्टींनी उर्मिलाला धूळ चारली. या लोकसभा मतदारसंघातील एकमेव काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी उर्मिलाच्या सेलिब्रिटीहूडचा प्रचारात भरपूर फायदा करून घेतला असला तरी त्याची परिणती मात्र मतवर्षावात होऊ शकली नाही. इतकेच नाही तर गेल्यावेळी दोन लाखांवर मतं खेचणार्‍या संजय निरुपमांइतकीही मतं उर्मिलाच्या पारड्यात पडली नाही. त्यातच हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक हिंसक धर्म आहे,” यांसारख्या उर्मिलाच्या वाचाळ विधानांना उत्तर मुंबईच्या मतदारांनी मतपेटीतून चांगलीच चपराक लगावली. शिवाय, मुस्लीमधर्मीयाशी लग्न करूनही हिंदू नाव मिरविणार्‍या उर्मिलेला समाजमाध्यमांवर टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे उत्तर मुंबईत २००४ च्या पुनरावृत्तीनुसार अभिनेताबाजी मारेल आणि लोकनेताघरी बसेल, ही शक्यता सर्वस्वी फोल ठरली.

 

गोपाळ शेट्टींचा संपूर्ण मतदारसंघातील जनसंपर्क, त्यांनी केलेली अगदी स्थानिक पातळीवरील विकासकामे, संसदेतील उत्कृष्ट कामगिरी, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची एकजूट आणि या मतदारसंघातील पारंपरिक भाजप मतदार यामुळे गोपाळ शेट्टींचा विजयाचा मार्ग प्रशस्त ठरला. या निवडणुकीचा निश्चितच सकारात्मक परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर दिसून येणार असून तेव्हाही उत्तर मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल, यात शंका नाही.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat