Live Update : स्मृती इराणी यांची राहुल गांधींवर सरशी

23 May 2019 13:43:46

 

उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत

उत्तर प्रदेश राज्यात खूप दिग्गज राजकारणींची प्रतिष्ठा पणाला लागली असताना सगळ्या देशाचे लक्ष असलेल्या महत्वाच्या लढतीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून उमेदवारी लढवत आहेत, त्यांच्याविरुद्ध शालिनी यादव अशी लढत आहे. मात्र सध्या मिळत असलेल्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी २ लाख ४७ हजार ३३५ मतांनी आघाडीवर आहेत. या आधी २०१४ च्या निवडणुकीत तब्बल ३ लाखांहून जास्त मतांसह विजयपताका फडकावली होती.

काँग्रेसचे अध्यक्ष अमेठीमधून निवडणूक लढवत आहे मात्र स्मृती इराणी यांचे आव्हान पेलणे तेवढे सोपे नसल्यामुळे ही लढाई चुरशीची ठरत आहे. सध्या स्मृती इराणी ९ हजार ७५७ आघाडीवर आहे. मात्र सोनिया गांधी यांनी फासे पालटवले असून त्या रायबरेली मतदारसंघात ६५ हजार ७६९ मतांनी आघाडीवर आहेत आणि दिनेश सिंह पिछाडीवर आहेत. त्याचबरोबर मनेका गांधी या सुलतानपूर मतदारसंघातून लढत असून ४ हजार ४०८ मतांनी आघाडीवर आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पुन्हा एकदा इतिहास गिरवणार असे दिसत आहे. राजनाथ सिंह लखनऊ मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असून २०८१४५ मतांसह आघाडीवर आहेत. पूनम शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरुद्ध ते निवडणूक लढत आहेत.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0