Live Update मुंबई: उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन आघाडीवर

    दिनांक  23-May-2019


 

देशभरात मतमोजणीची रणधुमाळी पेटली असताना मुंबई उत्तर मध्य मतदार संघात भाजप ला आघाडी मिळताना दिसत आहे. मुंबई उत्तर मध्य मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना आत्तापर्यंत ८३ हजाराहून जास्त मते मिळाल्याचे दिसत असून त्यांच्याविरुद्ध चुरशीची लढत असलेल्या प्रिया सुनील दत्त यांना ५१ हजार ९१३ मतांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार पूनम महाजन आघाडीवर असून भाजपच्या बाजूनी निकाल लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
 

  • ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे ६२ हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर असून त्यांची लढत काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्या विरुद्ध आहे.

  • मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात राहुल शेवाळे आघाडीवर असून त्यांना आत्तापर्यंत १ लाख ३८ हजार ८५३ मते मिळाली आहेत तर त्यांच्याविरुद्ध लढत असलेल्या एकनाथ गायकवाड यांना ९३ हजार ४७९ मते प्राप्त झाली आहेत.

 

  • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तिकर संजय निरुपम यांच्यावर आघाडी करताना दिसत आहेत. गजानन कीर्तिकर यांनी ८९ हजार पेक्षा जास्त मतांवर शिक्कामोर्तब केले असून संजय निरुपम यांना ४८ हजार मते मिळाली आहेत.

  • उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मनोज कोटक आघाडीवर दिसत आहेत. त्यांची लढत संजय पाटील यांच्याबरोबर आहे. मनोज कोटक यांना २ लाख ८४ हजार पेक्षा जास्त मते मिळाली असून संजय पाटील साधारण १ लाख ७१ हजार मतांसह पिछाडीवर आहेत. 

  • उत्तर मध्य मुंबई प्रमाणेच दक्षिण मुंबईमध्ये युती आघाडीवर दिसत आहे. अरविंद गणपत सावंत यांना आत्तापर्यंत ९० हजार ८७५ मते मिळाली आहेत तर त्यांची लढत मिलिंद देवरा यांच्याशी असून त्यांना ६७ हजार मते मिळाली आहेत.

  • उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर आमने सामने असून गोपाळ शेट्टी आघाडीवर आहेत. गोपाळ शेट्टी यांना १ लाख ४२ हजारापेक्षा जास्त मते मिळाली असून उर्मिला मातोंडकर यांना फक्त ४७ हजारापेक्षा जास्त मते मिळली असल्यामुळे निकाल गोपाळ शेट्टी यांच्या बाजूने कलताना दिसत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat