कोकणात शिवसेनेची सरशी : राणेंना धोबीछाड

23 May 2019 12:36:36

देशभरात मतमोजणीची वारे वाहत असतानाच कोकणात देखील उमेदवारांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये सध्याच्या समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार कोकणात शिवसेना बाजी मारताना दिसत आहे. १३ व्या फेरीत विनायक राऊत यांनी १ लाख ४ हजार ६६ मतांची आघाडी घेतली आहे.  


रायगड : रायगड मतदार संघातून अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात लढत सुरु आहे. यामध्ये सध्याच्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते ६० हजार ३८ मतांनी आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पिछाडीवर आहेत. या आधी २०१४ च्या लोकसभा मतदानामध्ये अनंत गीते २ हजार ११० मतांनी विजयी झाले होते आता या वर्षीचा निकाल देखील त्यांच्याच बाजूने लागेल अशी चिन्हे दिसत आहेत.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग : रायगड प्रमाणेच रत्नागिरीत सुंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत ६८ हजार ९५५ मतांनी आघाडीवर असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे पिछाडीवर आहेत. रत्नागिरी आणि सिधुदुर्ग मतदारसंघात या आधी देखील शिवसेनेने गड राखल्याचा इतिहास आहे त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0