ही मोदीजींची त्सुनामी ; मुख्यमंत्री फडणवीस

    दिनांक  23-May-2019मुंबई : "मा. मोदीजींच्या बाजूने एक सायलंट प्रकारची वेव्ह आहे, जी त्सुनामीमध्ये परिवर्तित होत आहे. ही देशातील मध्यमवर्गीय आणि गरीब जनता ही मोदींना निवडून देण्यात उत्सुक आहेत. हा भाजपचा आणि नरेंद्र मोदीजींचा प्रचंड मोठा विजया आहे ." अशी भावना महाराष्ट्राचे मुकळ्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या त्सुनामीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसून येत आहेत.

 

"भाजप-शिवसेना युतीने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. मागच्या वेळी भाजप-शिवसेना मिळून ४१ जागांवर विजय मिळवला होता. आता त्याच्याही पलीकडे आम्ही जाऊ." असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवला आहे. "जनतेने दिलेला हा कौल अभूतपूर्व आहे. आम्ही जस आधी म्हणत होतो कि आम्हाला चान्गले यश मिळेल परंतु बरेच हे मानायला तयार नव्हते. जनतेने त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. दुष्काळासारख्या समस्यातून आपल्याला युतीचे सरकार बाहेर काढू शकेल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच आमच्यावर विश्वास दाखवल्याचे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इतर घटक पक्षांचेही आभार मानले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat