LIVE UPDATE : आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंची दुहेरी दैना

    दिनांक  23-May-2019नवी दिल्ली : आंध्र प्रदेश राज्यात सगळ्यात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षाला खूप मोठा फटका बसला आहे. तसेच, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २३ जागांवर आघाडी घेतली आहे. तेलगू देसमला केवळ २ जागांवर आघाडीवर आहेत. या मोठ्या पराभवामुळे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

विधानसभेतदेखील जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने विधानसभेच्या १७५ पैकी १४२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देशम पक्षाला केवळ ३० जागांवर आघाडी आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात सत्ताधारी टीडीपीला मोठा धक्का बसला आहे. केवळ विधानसभेतच नाही तर लोकसभेत सुद्धा मुख्यमंत्री नायडूंना धक्का बसला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat