'भारत' मधील 'तूरपेया' हे गाणे प्रदर्शित

22 May 2019 14:34:55


अली अब्बास जफर दिग्दर्शित
'भारत' या चित्रपटामधील आणखी एक गाणे आज प्रदर्शित झाले. या नव्या 'तूरपेया' नावाच्या गाण्यात नोरा फतेही आणि सलमान खानचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमान आणि नोरा बरोबरच सुनील ग्रोव्हर देखील या गाण्यात एंट्री घेणार आहेत. विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे सुखविंदर सिंह यांच्या भरदार आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे.

 

सलमान खान या गाण्यामध्ये एका नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. या उडत्या चालीच्या गाण्याचे शब्द इर्शाद कामिल यांनी लिहिले असून गाण्यातील गिटार वोरन मेंडोसा यांनी वाजवली आहे. गाण्याला निर्मिती साहाय्य अभिजित नलानी यांनी केले आहे. भारत या चित्रपटातील या आधी प्रदर्शित झालेल्या 'एथे आ' या गाण्याला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

भारत या चित्रपटात एका माणसाची आणि त्यांच्या देशातील नाट्यमय घडामोडींची कथा आहे. सलमान खान आणि कतरीना कैफ बरोबरच या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोव्हर आणि असिफ शेख हे सहायक कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपट येत्या ५ जुल ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0