विश्वचषकाच्या युद्धासाठी टीम इंडिया रवाना

    दिनांक  22-May-2019


 


नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०१९ला येत्या ३० मेपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचा संघ मंगळवारी मध्यरात्री इंग्लंडची रवाना झाला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर फोटो टाकून विराटसेना विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना झाल्याची माहिती दिली. ३० मे ते १४ जुलैपर्यंत हा विश्वचषक चालणार आहे.

 
 
 

क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या मते भारतीय संघ हा यंदाच्या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. जगभराचे लक्ष विराटसेनेकडे आहे. संघातील बरेचशे खेळाडू हे आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात दिसले होते. विराट कोहलीचा संघ टाळला जरी असला तरी त्याची बॅट मात्र तळपत होती. तसेच, महेंद्र सिंग धोनीला गवसलेला चांगला सूर हीदेखील भारतासाठी चांगली बाब आहे.

 
 
 

"यंदाचा विश्वचषकाचे वेगळे स्वरूप पाहायला मिळणार आहे. भारताला तब्बल ११ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे कुठलाही संघ, कुठलाही सामना उलटफेर करू शकतो." असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. तसेच सध्याचा भारतीय संघ हा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकू शकतो असा विश्वासदेखील दिला. भारताने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. सन १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात आणि सन २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat