टाटा स्काय सेट टॉप बॉक्सवर ४०० रुपयांची सुट

    दिनांक  22-May-2019 

मुंबई : टाटा स्कायतर्फे स्टँडर्ड डेफिनेशन (एसडी) आणि हाय डेफिनेशन (एचडी) सेट बॉक्सच्या किमती चारशे रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रेक्षकांना डीश टीव्ही सेट ऑफ बॉक्स उपलब्ध करून देण्याचा उद्देश कंपनीने समोर ठेवला आहे. टाटा एसडी आणि एचडी सेट टॉप बॉक्स आता अनुक्रमे १६०० आणि १८०० रुपयांना उपलब्ध असतील.

 

विविध प्रकारच्या डिजिटल दर्जेदार वाहिन्या आणि सेवांचा लाभ भारतभरातील प्रत्येक कुटुंबाला मिळावा याची खातरजमा करण्याच्या उद्देशाने टाटा स्कायने हे पाऊल उचलले आहे. नव्या किमतीतील सेट टॉप बॉक्स आता भारतातील सर्व शहरे आणि गावांमधील स्थानिक वितरक आणि रीटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांना विविध टेलर-मेड (गरजांनुरुप तयार केलेले) पॅक्स वाहिन्या आणि बंडल्ड कॉम्बो उपलब्ध आहेत. शिवाय, यात त्यांना हव्या त्या वाहिन्या घेण्याची किंवा नाकारण्याचीही सोय आहे.

 

टाटा स्कायने ग्राहकसेवा (१२ भाषांमधील कॉल सेंटर्स), अग्रणी तंत्रज्ञान (रेकॉर्डर, के सेट टॉप बॉक्स, टाटा स्काय बिंज) आणि ६०० हून अधिक वाहिन्या आणि सेवा देऊ करत सबस्क्राइबर्सना आनंदाचा ठेवा देऊन नवे मापदंड स्थापित केले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat