पाकिस्तानी बोट ताब्यात; ६०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

    दिनांक  22-May-2019


 


गुजरात : गुजरातच्या पोरबंदरमध्ये भारतीय नौसेनेने एक पाकिस्तानची संशयित बोट ताब्यात घेतली आहे. याबोटीमध्ये तब्बल २३२ कोटींचे अमली पदार्थ सापडले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत ६०० कोटी एवढी आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीला लागून असलेल्या २०० सागरी मैल परिसरात गेल्या दोन दिवसांपासून शोध घेतल्यानंतर नौसेनेला ही बोट पकडण्यात यश आले.

 

गेल्याच आठवड्यात केंद्रीय गुप्तचर विभागाने दहशतवादी हल्ल्याच्या शक्यता असल्याचा इशारा दिला होता. यानुसार भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस यांनी गुजरात सहमुंबईत अलर्ट जारी केला होता. एक पाकिस्तानी बोट अंमली पदार्थांचा मोठा साठा घेऊन भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणार असल्याची खबर १९ मे रोजी तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर महसूलविषयक गुप्तवार्ता संचानालयाकडूही या बोटीविषयी तटरक्षक दलास सतर्क करण्यात आले.

 

"मंगळवारी सकाळी तटरक्षक दलाला जखाऊ किनाऱ्यापासून ८ सागरी मैल अंतरावर 'अल मदिना' ही मच्छिमार बोट दिसली. पाकिस्तानी खलाशांनी बोट पळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण खवळलेल्या समुद्रातही तटरक्षक नौकांनी बोटीला घेरले. खलाशांनी अंमली पदार्थांच्या गोणी पाण्यात फेकल्या, पण त्यापैकी ७ गोण्या जप्त करण्यात आल्या. बोटीसह ६ पाकिस्तानी खलाशांना ताब्यात घेण्यात आले." अशी माहिती तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक व्हीएसआर मूर्ती यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat