भारताच्या 'रिसेट २ बी'मुळे पाकड्यांचे धाबे दणाणले

    दिनांक  22-May-2019


 


नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने बुधवारी पहाटे इस्रोने रिसेट-२ बीआर१ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या या प्रक्षेपणामुळे पाकिस्तानचे धाबे मात्र दणाणले आहे. या उपग्रहामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर, तसेच सीमेवरील घुसखोरीच्या कारवायांवर भारताचे लक्ष राहणार आहे. रिसेट-२बीच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता अन्य मॉनिटरिंग उपग्रह सोडण्याच्याही तयारीत आहे. रिसेट -२बी आर १, २बी आर २, रिसेट-१ए, १बी, २ए यासह इस्रो आणखीही उपग्रह अवकाशात सोडणार आहे. २००९ आणि २०१२ या वर्षांमध्येही इस्रोने या श्रेणीतील उपग्रह सोडले होते. यावर्षी चार ते पाच मॉनिटरिंग उपग्रह सोडणार आहे.

 

रिसेट-२बी उपग्रह देशाच्या सुरक्षेत देणार अमूल्य योगदान

 

रिसेट-२ बीआर१ हा उपग्रह देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचा वाटा उचलणार आहे. या उपग्रहाद्वारे खराब हवामान असतानातही भारताला देशाच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा उपग्रह महत्त्वाचा मानला जात असून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकसारख्या कारवायांचे फोटोही घेणेही आता शक्य होणार आहे.

 

पाकिस्तानचे सॅटेलाइटचे संख्याबळ अवघे ६

 

पाकिस्तानने आतापर्यंत केवळ ६ सॅटेलाइट प्रक्षेपित केले आहे. बीएडीआर -१, बीएडीआर-बी, पाकसॅट -१आर, आयक्यूब -१, पीआरएसएस-१ आणि पाकटीईएस-१ अ हे ६ उपग्रह पाकिस्तानने अंतराळ प्रक्षेपित केले आहे. तर, याउलट भारताने १९७५पासून आतापर्यंत १०८ पेक्षा अधिक सॅटेलाइट प्रक्षेपित केले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat