"इव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत"

    दिनांक  22-May-2019


 

अमित शाहांचे विरोधकांना सवाल 

 

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालापूर्वी इव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या एकूण २२ पक्षांना भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी थेट प्रश्न विचारले आहेत. इव्हीएमचा विरोध हा जनतेच्या कौलाचा अनादर असल्याची टीका त्यांनी केली. पराभव समोर दिसत असल्याने सैरभैर झालेल्या विरोधी पक्षांनी आता इव्हीएमवर आक्षेप घेण्यास सुरुवात केल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. देशातील सर्वात मोठी लोकशाही जिथे बळकट करण्याची जबाबदारी राजकीय पक्षांवर आहे आता तेच पक्ष इव्हीएमवर खापर फोडत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी यादरम्यान एक ट्विट करत विरोधी पक्षांना थेट सवाल विचारले आहेत.

 

प्रश्न १ : इव्हीएमवर आता अविश्वास दाखवणारे पक्ष कधीकाळी त्याच मतपेट्यांतून मिळालेल्या विजयामुळे सत्तेत आले होते. आता त्याबद्दल अविश्वास का दाखवत आहेत. इव्हीएमवर विश्वास नाही तर जिंकल्यानंतर सत्ता का नाकारली नाही?

 

प्रश्न २ : न्यायव्यवस्थेने तीन जनहीत याचिकांचा विचार केल्यानंतरही निवडणूक निकाल प्रक्रीया पद्धत कायम ठेवली आहे. त्यामुळे ज्यांनी इव्हीएमवर आक्षेप घेतला आहे ते सर्वोच्च न्यायालयावरही आक्षेप घेत आहेत. का ?


 

 

प्रश्न ३ : मतमोजणीपूर्वी ज्या २२ विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅट मतमोजणी प्रक्रीयेत बदलाची मागणी करणे कितपत योग्य आहे. सर्व राजकीय पक्षांचा विचार घेणे आवश्यक नाही का ?

 

प्रश्न ४ : विरोधीपक्षांनी निवडणूकीच्या सात टप्प्यांनंतरच इव्हीएमवर आक्षेप का घेतला आहे. त्यापूर्वी त्यांनी याचा उल्लेखही केला नाही. एक्झिट पोलनंतर आलेल्या आकडेवारीतून इव्हीएमवर आक्षेप घेणे कितपत योग्य आहे ?


 

 

प्रश्न ५ : व्हीव्हीपॅट मतदान पद्धत पहिल्यांदाच लागू करण्यात आली आहे. कोणत्या पक्षाला तुम्ही मतदान दिले हे त्यात स्पष्ट दिसून येते, त्यानंतरही यात फेरफार कसा केला जाऊ शकतो ?

 

प्रश्न ६ : काही पक्ष मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान हत्यारे उपसण्याची धमकी देत आहे, रक्ताचे पाट वाहू, अशा धमक्या देत आहेत, अशी हिंसात्मक विधाने करून ते कुणाला धमकावत आहेत. कोणाला आव्हान देत आहेत. ?


 

 

 

विरोधी पक्षांनी व्हीव्हीपॅटच्या मोजणीची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेली आहे. न्यायालयानेही चेन्नईतील एका खासगी कंपनीची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजपने आता विरोधकांवर इव्हीएम प्रकरणी जोरदार पलटवार चढवण्यास सुरुवात केली आहे. 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat