गेल्या ५ महिन्यात ८६ दहशतवादी ठार

    दिनांक  22-May-2019जम्मू काश्मीर : भारतीय लष्कर आणि दाहासातवाडी यांच्या सध्या एलओसीवर चकमकींचे सत्र सुरूच आहेत. गेल्या ५ महिन्यात ८३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लष्कराने दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी रात्री उशिरा चकमक सुरू झाली. यामध्ये २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आले आहे.

 

यापूर्वी १६ मे रोजी चकमक झाली होती. यामध्ये पुलवामाच्या दलिपोरा भागात ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या एका जवानालाही वीरमरण आले होते. बडग्राम येथील चाडूरा जवळच्या गोपालपोरा-कुलग्राम येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. घरांची तपासणी करताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला उत्तर देण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात २ दहशतवादी ठार झाले.

 

काश्मीरमध्ये गेल्या ५ दिवसात विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत १५ हून अधिक दहशतवादी ठार केले आहेत. पुलवामा आणि शोपियां येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत ६ दहशतवादी ठार केले होते. तर दक्षिण काश्मीरमधीलच पुलवामामधील पंजग्राम सेक्टरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat