निवडणूक आयोगामुळेच देशात लोकशाही टिकून - प्रणव मुखर्जी

    दिनांक  21-May-2019नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. देशाचे प्रथम निवडणूक आयुक्त सुकूमार सेन यांच्यापासून ते विद्यमान निवडणूक आयुक्तांपर्यंत सर्वांनीच योग्य रित्या नियोजन करून निवडणुका पार पाडल्यामुळेच देशात आजही लोकशाही टिकून असल्याचे ते म्हणाले. एनडीटीव्हीच्या पत्रकार सोनिया सिंह यांच्या डिफाइनिंग इंडिया: थ्रू देयर आइज' या पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.

 

निवडणूक आयोगावर निवडलेले आयुक्त त्यांची जबाबदारी योग्य रित्या पार पाडत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. भारतात लोकशाही यशस्वी ठरण्यामागे याच लोकांचा हात असल्याचे मुखर्जी म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व इतर विरोधकांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची मुखर्जी यांनी हवाच काढून घेतली असल्याचे बोलले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat