खांडपे जंगल बनले पशुपक्ष्यांचे माहेरघर

21 May 2019 21:00:35


 

ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नांना यश

 

मुरबाड : तालुक्यातील खांडपे जंगलामध्ये वाढत्या वनीकरणामुळे मागील दोन वर्षापासून वन्यजीव प्राण्यांचे देखील प्रमाण वाढलेले आहे. विशेष म्हणजे जंगलामध्ये नीलगाय, मोर ,ससे आणि इतर विविध प्रकारचे वन्यजीव प्राण्यांचे आणि पक्षांचे प्रमाण देखील वाढले आहे. या जंगलामध्ये तलाव असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या ठिकाणी स्थलांतर करतात. या प्राण्यांमध्ये विशेषता नीलगाय आणि मोर वन्यजीवांचे प्रमाण अधिक असून शेकडो प्राणीमित्र ,निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देतात.

संध्याकाळच्या वेळेत शेकडो व्यक्तींना प्रवास करताना वन्यजीव प्राण्यांचे मनमोहक दर्शन घेता येते. गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने केलेल्या प्रयत्नामुळे वृक्षतोडीला आळा बसलेला आहे. या विभागात संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग यांच्या प्रयत्नामुळे वनव्यांंना देखील आळा बसल्याने खांडपे जंगल वन्यजीव प्राण्यांसाठी पोषक ठरत आहे.

वन्यजीव प्राण्यांच्या अन्न ,निवारा गरजा या जंगलामध्येच पूर्ण झाल्याने पशूपक्षांचे माहेरघरच आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केलेल्या प्रयत्नामुळेच जंगलाची वाढ झाल्याने वन्य प्राण्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. वन्य प्राण्यांच्या गरजा अन्न ,पाणी या जंगलातूनच भागविल्या जातात, त्यामुळे तेथे मागील दोन वर्षात वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली दिसते."

विकास भामरे, वन परिक्षेत्र अधिकारी मुरबाड पूर्व.

 
 

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat






 

Powered By Sangraha 9.0