काँग्रेसने मुस्लिमांचा वापर करून घेतला

    दिनांक  21-May-2019काँग्रेसचे नेते रोशन बेग यांचा गंभीर आरोप


नवी दिल्ली : कर्नाटक काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस पक्षावरच गंभीर आरोप केले आहेत. आजपर्यंत काँग्रेसने मुस्लिमांचा फक्त वापर करून घेतला असून या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकाही ईसाई व्यक्तीला उमेदवारी दिली नसल्याचा आरोप बेग यांनी केला. एवढंच नाही तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने फक्त एकाच मुस्लिम नेत्याला उमेदवारी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

बेग यांनी सोमवारी बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करत काँग्रेससाठी मुस्लिम समुदाय हा फक्त मतदानापुरताच आठवत असल्याचे सांगितले. काँग्रेसने आमचा फक्त वापर करून घेतला. आम्हाला कोणी एका पक्षाने गृहीत धरू नये, गरज पडली तर आम्ही भाजपाशीही हात मिळवणी करू शकतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

यावेळी त्यांनी केसी वेणुगोपाल, दिनेश गुंडु राव व सिद्धारमैया यांच्यावरही हल्लाबोल केला. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून न आल्यास याला वेणुगोपाल यांच्यासारखा विदूषक, सिद्धारमैया यांचा गर्विष्ठपणा व गुंडू राव यांचा फ्लॉप शो कारणीभूत असणार असल्याचेही बेग म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat