‘मीडियम स्पाइसी’ ची मधुर सुरुवात

21 May 2019 11:27:48



आधुनिक काळात कथा सांगण्याच्या पद्धतीत बदल होत आहे. नव्या दमाच्या लेखक आणि दिग्दर्शकासह जबाबदार चित्रपट निर्मात्यांनी आपल्यामीडियम स्पाइसीया नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पहिला क्लॅप खुद्द लेखिका इरावती कर्णिक यांच्या हस्ते दिल्यानेमीडियम स्पाइसीची मधुर सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुतमीडियम स्पाइसीया चित्रपटाची निर्मिती विधि कासलीवाल यांची आहे.मीडियम स्पाइसीहा चित्रपट अनेक बाबींमध्ये युनिक आहे. इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून आलेली कथा सुद्धा एका हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाचा विषय इरावती यांच्या अतिशय जवळचा असून या कथेशी त्यांची भावनिक नाळ जुळलेली आहे. इरावती यांनी यापूर्वीगाशा’, ‘तीच ती दिवाळी’, ‘पैसा वसूल’, ‘बाळकडू’, ‘मृगाचा पाऊसआदी एकांकिकाचे तरएक राधा एक मीरा’, ‘परी हूँ मै’, ‘आनंदी गोपाळअशा चित्रपटाचे लेखन केले आहे. तसेच इरावती कर्णिक यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचायुवा पुरस्कारमिळाला आहे.

लेखिका इरावती कर्णिक आणि मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणारे नाटककार मोहित टाकळकर यांच्या डोक्यातून मूर्त रुपात आलेली हीमीडियम स्पाइसीकथा नेमकी काय आहे याच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि अभिनेता ललित प्रभाकर अशी जबरदस्त स्टारकास्ट तसेच बहुआयामी दिग्दर्शक मोहित टाकळकर आणि प्रतिभाशाली लेखिका इरावती कर्णिक यांना निर्मात्या विधि कासलीवाल यांची लाभलेली भक्कम साथ यामुळे प्रेक्षकांच्या मनातमीडियम स्पाइसीचित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झालेली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0