पश्चिम बंगालमधील 'या' ठिकाणी होणार फेरमतदान

    दिनांक  21-May-2019कोलकत्ता : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. यामुळे कोलकत्ता उत्तर लोकसभा मतदार संघातील २०० क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद ठरवण्यात आले होते. मात्र आता या ठिकाणी पुन्हा एकदा फेर मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

 

लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी म्हणजे २२ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी ज्या ठिकाणी हिंसाचार घडला होता त्याठिकाणी पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat