राज तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी!

    दिनांक  20-May-2019एक्सिट पोलनंतर मोदी व भाजप समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावली असून आता प्रतीक्षा निकालाची असणार आहे. अशातच रविवारी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाची सांगता झाल्यानंतर माध्यमांनी आपले एक्सिट पोलचा अंदाज वर्तवला. यात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे मोदी व भाजप समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून हा उत्साह सोशल मीडियावर दिसून येत आहे.


राज तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी!, 'मैंने कहा था ना, आएगा तो मोदी ही', आएगा तो मोदी ही, मोदी आयेगा, अशा अनेक प्रकारच्या पोस्ट आणि मिम्स रविवारी रात्रीपासून प्रचंड व्हायरल होत आहेत.


एक्सिट पोलवर विरोधकांनी नाराजी दाखवली असून हे एक्सिट पोल फसवे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सोशल मीडिया यूजरने विरोधकांचा खरपूस समाचार घेतला असून 'मोदी केदारनाथला जाऊन आले, शाह सोमनाथला जाऊन आले, योगी गोरखनाथला जाऊन आले आणि विरोधक अनाथ झाले', अशा आशयाचे ट्विट व्हायरल होत आहेत.


काही युजर तर छातीठोकपणे सांगत आहेत की, मी सांगितले होते ना येणार तर मोदीच! तर काही युजरने एनडीटीव्हीने भाजप मित्रपक्षाला बहुमत दिले असल्याने मला दुसरे एक्सिट पोलच पाहायचे नसल्याचे सांगण्यात येत आहे.


त्यामुळे आता हे एक्सिट पोल २३ मे रोजी कायम राहतात का? हे आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat