उत्तर प्रदेशचे मंत्री राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

    दिनांक  20-May-2019मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली कारवाई


उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. वादग्रस्त विधानाने करून राजभर हे वाद ओढवून घ्यायचे यामुळे सरकारची प्रतिमा मालिन होत होती, याचमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजभर यांची हकालपट्टी केली असल्याचे बोलले जात आहे. राजभर यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावर राज्यपाल राम नाईक यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

 

उत्तर प्रदेश सीएमओच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून राजभर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (एसबीएसपी) अध्यक्ष असून त्यांच्याकडे मागास वर्ग कल्याण आणि दिव्यांग कल्याण मंत्रिमंडळाचा भार होता. राजभर यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाच्या अन्य नेत्यांचीही विविध शासकीय पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे राजभर यांनी स्वागत केले असले तरी गरिबांवर अन्याय होत असल्याचे सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळातील हकालपट्टीनंतर राजभर काय निर्णय घेतात याकडे उत्तर प्रदेशच्या जनतेचे व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat