आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

    दिनांक  20-May-2019केवळ 'जावा' आणि 'डॉटनेट' प्रणालीवर अवलंबून राहिल्याचा परिणाम


नवी दिल्ली : काळानुरूप न बदलल्याचा फटका ज्याप्रमाणे प्रत्येकाला बसू लागतो, अशीच काहीशी अवस्था आयटी कर्मचाऱ्यांचीही होत आहे. तंत्रज्ञानानुसार 'अपडेट' न झाल्यास नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी आयबीएमने अशा तिनशे कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. अॅमेझॉन, अलिबाबासारख्या कंपन्यामध्येही आता अतिकुशल कामगारांनाच नोकऱ्या शिल्लक आहेत. जाणकारांच्या मते, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारले नाही तर नोकरी गमवावी लागू शकते. इतर क्षेत्रांमध्येही काही प्रमाणात हिच बाब लागू पडणार आहे. काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा पर्याय न स्वीकारता प्रशिक्षण देण्याची सुरुवातही केली आहे.

 

मशीन लर्निंगचा फटका

ऑनलाईन रिटेल क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी अॅमेझॉनने मशीन लर्निक आणि रोबोटीक्सचा पर्याय स्वीकारला आहे. विशेषतः भारतातील बड्या कंपन्याही याच मार्गावर आहेत. खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट, रिलायन्स आदी कंपन्यांनीही ऑटोमेशनचा पर्य़ाय स्वीकारला आहे. या कारणामुळेच माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणी बदलत आहे. आता केवळ 'जावा' आणि 'डॉटनेट' या पर्यायांशिवाय एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला 'पायथन', रोबोटीक्स प्रोसेस ऑटोमेशन, बिग डाटा, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, ऑगमेंटेरी रिअल्टी, युआयस आणि युएक्स डिझाईन आदींमध्ये दक्ष असण्याची गरज आहे.

 

पारंपारिक उत्पन्न केवळ ४० टक्क्यांवर

एका अहवालानुसार, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सॉफ्टवेयर इंजिनिअर्सची संख्या ३० लाख आहे. यात बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट कंपन्यांचा सामावेश होत नाही. यापैकी ६ लाख इंजिनिअर हे डिजिटल टेक्नॉलोजीतही दक्ष आहेत. आत्तापर्यंत आयटी कंपन्यांचा ८० महसूल हा ठराविक सेवांमधून उपलब्ध होतो. मात्र, आयटी कंपन्यांची शिखर संस्था नॅस्कॉमच्या मते, २०२५ पर्यंत हे पारंपारिक तंत्रज्ञानानुसार येणाऱ्या महसूलात ४० टक्क्यांनी घट येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात आता अपडेट होणे गरजेचे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat