२०१६ मध्येच झाला पहिला सर्जिकल स्ट्राईक : लेफ्टनंट जनरल सिंग

    दिनांक  20-May-2019नवी दिल्ली : 'भारताने पहिला सर्जिकल स्ट्राईक हा सप्टेंबर २०१६मध्येच केला.' अशी माहिती भारतीय सैन्यदलाचे उत्तर विभागाचे कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तसेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. ही हवाई दलाची उल्लेखनीय कामगिरी होती, असेही ते म्हणाले.

 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राईक आणि बाळकोट एअर स्ट्राईकचा मुद्द्दा उचलण्यात आला. यावर संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला. 'राजकीय पक्ष सर्जिकल स्ट्राईकवर काय वक्तव्य करतात, याबाबत आपण काहीही बोलणार नाही. त्यांना सरकारच उत्तर देईल.' असेही सिंग यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, '२०१६ पूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.' असे स्पष्ट केले.

 

काही दिवसांपूर्वीच जम्मू येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने पहिला सर्जिकल स्ट्राईक कधी झाला याची माहिती, माहिती अधिकाराखाली मागवली होती. त्यावेळीही डीजीएमओने पहिला सर्जिकल स्ट्राईक सप्टेंबर २०१६मध्ये झाल्याची माहिती दिली होती. 'बालाकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राईक हे सर्वात मोठे यश आहे. त्यानंतर पाकिस्तानकडूनही घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे प्रयत्न हणून पाडण्यात आले.' असेही त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat