देशातील धरणांमधील जलसाठ्यात १ टक्क्यानी घट

02 May 2019 18:41:27



नवी दिल्ली : देशातील महत्वाच्या ९१ धरणांमधील पाणीसाठ्यात १ टक्क्यानी घट झाली आहे. ९१ धरणातल्या जलसाठ्यांमध्ये २ मे २०१९ रोजी संपलेल्या आठवड्यात ४०.५९२ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते २५ टक्के इतके आहे. या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता १६१.९९३ अब्ज घनमीटर इतकी आहे. ९१ पैकी ३७ जलसाठ्यांवर ६० मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

 

पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून, यामध्ये २७ धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या ५.२२ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0