प्रज्ञा सिंहांच्या विरोधातील ट्विटमुळे फरहान अख्तर ट्रोल

19 May 2019 19:17:13


 


मुंबई : लोकसभा मतदानासाठीचा सातवा टप्पा सुरु भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मतदान करून नका, असे आवाहन करणारे ट्विट केल्यामुळे सिने अभिनेता फरहान अख्तर याला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मतदारसंघात सहाव्या टप्प्यातच मतदान झाले आहे, आता आवाहन करून काय उपयोग? अशा शब्दांत नेटकऱ्यांनी फरहान अख्तरची चांगलीच हजेरी घेतली.

 
 
 

'भोपाळच्या प्रिय मतदारांनो, तुमच्या शहराला आणखी एका गॅस दुर्घटनेपासून वाचवण्याची वेळ आली आहे’, असे ट्विट फरहान अख्तर याने केले होते. त्यावरून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘गॅस दुर्घटना आणि त्यातील बळी यांची चेष्टा करता, निर्लज्ज’ अशी प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली आहे. ‘तुझे इंटरनेट कनेक्शन बदलून घे, तुझे ट्विट प्रकाशित व्हायला दहा दिवसांचा उशीर झाला आहे, असे एकाने सुनावले. ‘या लोकांचा वास्तव जगाशी संबंध तुटला आहे’ अशी टीका एकाने केली. एवढी टीका होऊनही फरहानने उशिरापर्यंत ट्विट डिलीट केले नव्हते. फरहानने ट्विट केल्यानंतर अवघ्या चार तासांत १६०० रिट्विट आणि ८ हजार ६०० रिप्लाय आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0