आज बुद्ध पौर्णिमा; राष्ट्रपती, पंतप्रधानानी दिल्या शुभेच्छा

    दिनांक  18-May-2019नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुद्ध पौर्णिमेनिम्मित जनतेला शुभेच्छा दिल्या. अहिंसा, शांतता, करुणा आणि मानवसेवा या भगवान बुद्धांच्या शिकवणीतल्या मूल्यांचा मानवी इतिहास आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव राहिला आहे. सध्याच्या काळासाठी ही मूल्ये अधिकच समर्पक असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 

यासोबतच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. भगवान बुद्ध हे या धरतीवरचे महान आध्यात्मिक नेते होते. अहिंसा आणि करुणा हा त्यांनी दिलेला शाश्वत संदेश जगभरातल्या मानवतेला सदैव स्फुर्ती देत राहिल असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या आनंदाच्या प्रसंगी धर्म, करुणा आणि मैत्री या भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध राहूया असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.

 

अहिंसा, शांतता, करुणा आणि शांतीचे प्रणेते भगवान बुद्ध यांचे विचार देशातील नागरिकांना नेहमी प्रेरित करत राहतील असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुद्ध पौर्णिमेनिम्मित जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

बुद्धपौर्णिमेचा पवित्र दिवस भगवान बुद्धांच्या महान जीवन कार्याचे तसेच त्यांच्या करुणा, अहिंसा, समता व प्रेम या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो. या मंगल प्रसंगी राज्यातील सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, असे सांगत राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat