'डिवाइडर इन चीफ'वर मोदींनी सोडले मौन, म्हणाले...

18 May 2019 13:18:35



नवी दिल्ली : टाइम मासिकाच्या 'डिवाइडर इन चीफ' या कव्हर स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे. या स्टोरीचा लेखक हा पाकिस्तानी असून तो पाकिस्तानातील एका राजकीय परिवाराचा सदस्य आहे. त्यामुळे त्याच्या लेखावर व म्हणण्यावर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आहे.

 

आतिश तासीर या लेखकाने टाइम मासिकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय राजकारण यावर एक स्टोरी केली होती. यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाझोखा घेतला आहे. मोदी हे भारताचे विभाजन करणारे नेते असल्याचा उल्लेख केला होता.

 

यावर शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी मौन सोडत तासीर याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी मोदी म्हणाले, "टाइम हे विदेशी मासिक आहे. या स्टोरीचा लेखक हा पाकिस्तानी असून तो पाकिस्तानातील एका राजकीय परिवाराचा सदस्य आहे. यावरूनच त्याची मानसिकता लक्षात येते." दरम्यान, २० मे रोजी हे मासिक प्रसिद्ध होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0