लोकसभा निवडणूक; अंतिम टप्प्यात उद्या होणार मतदान

    दिनांक  18-May-2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडणार आहे. या अंतिम टप्प्यात ८ राज्यातील ५९ लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडेल. यामध्ये बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व चंदीगढ या सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.

 

१ लाख १२ हजारापेक्षा जास्त मतदानकेंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यात ९१८ उमेदवारांचे भवितव्य कैद होणार आहे. यासाठी १० कोटी १ लाख ७५ हजार पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बिहारमधील ८, हिमाचल प्रदेशमधील ४, झारखंडमधील ३, मध्य प्रदेशमधील ८, पंजाबमधील १३, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील ९ व चंदीगढमधील १ मतदार संघावर मतदान होईल.

 

दरम्यान, आतापर्यंत देशभरात पाच टप्प्यात मतदान झाले असून पहिल्या टप्प्यात २० राज्यात ९१ मतदारसंघामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये १३ राज्यात ९७ मतदारसंघामध्ये, तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यामध्ये ११५ मतदारसंघात, चौथ्या टप्प्यात नऊ राज्यात ७१ मतदारसंघात, पाचव्या टप्प्यात सात राज्यात ५१ मतदारसंघात तर सहाव्या टप्प्यात ७ राज्यातील ५९ लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat