संजय लीला भन्साळी निर्मित 'मलाल' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

18 May 2019 17:35:58



 

संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला 'मलाल' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अत्तापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांचे आयुष्य संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केल्यानंतर पालटले. मग यामध्ये दीपिका आणि रणवीर सारख्या प्रसिद्ध कलाकारांचे देखील नाव येते. मात्र 'मलाल' या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मीन सेहगल आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरी हे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.




 

मंगेश हडवळ दिग्दर्शित 'मलाल' ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भट देखील यांचा देखील सहभाग असल्याची चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून भन्साळी यांच्या चित्रपटातील दोन नवीन चेहरे कोण आहेत हा प्रश्न गुलदस्त्यात असताना अखेर प्रेक्षकांना याचे उत्तर आज मिळाले आहे.

 

'मलाल' ही शिवा आणि आस्था या दोघांमधील प्रेमाची गोष्ट आहे. ते दोघेही अतिशय भिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली पात्र आहेत. त्यामुळे त्यांचे हे प्रेम यशस्वी होते की नाही याचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0