गणेशोत्सवात कोकणवासीयांच्या मदतीला धावणार म.रे.

    दिनांक  18-May-2019मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यात कोकणातील लोकांची गावाकडे जाण्याची ओढ असते. अशातच कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल १६६ विशेष मेल आणि एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. ध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत या गाड्या धावणार आहेत.

 

अशा असतील फेऱ्या :

 

- मुंबई ते सावंतवाडी दरम्यान २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत २६ फेऱ्या

 

- गाडी क्रमांक ०१००१ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटाला पोहोचेल. तसेच, गाडी क्रमांक ०१००२ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीहून सुटेल.

 

- गाडी क्रमांक ०१००७ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या १२ फेऱ्या चालविण्यात येतील. २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी ती रात्री १२.२० ला सुटेल. गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता सुटेल.

 

- गाडी क्रमांक ०१०३३ मुंबई-रत्नागिरी-पनवेल २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत ३२ फेऱ्या चालविण्यात येतील. ती सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०१०३४ रत्नागिरीहून रात्री १०.५० वाजता सुटेल.

 

- पनवेल-सावंतवाडी-मुंबई २२ फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल ८ फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी ८ फेऱ्या, पनवेल-थिवीम आणि पुणे-रत्नागिरी ६ फेऱ्या (व्हाया कर्जत-पनवेल) तसेच पुणे-करमळी २ फेऱ्या चालविण्यात येतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat