७२ तासात ११ दहशतवाद्यांचा खात्मा

    दिनांक  18-May-2019नवी दिल्ली : शुक्रवारी जम्मू काश्मीरच्या सोपोरमधील हाथलंगू गावामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये भारतीय लष्कराला ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. गावामध्ये ३ दहशवादी लपले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शोध मोहीम चालू केली होती. याआधी पुलवामा आणि अनंतनागमध्ये २ चकमकी झाल्या होत्या, ज्यामध्ये ५ दहशतवादी मारले गेले होते.

 

गेल्या काही तासांमध्ये भारतीय लष्कराने दहतवाद्यांना यमसदनी धाडून आपले काम यशस्वीपणे पार पडत आहेत. गेल्या ७२ तासांमध्ये ११ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही तासांमध्ये आतापर्यंत एकूण ६ चकमकी झाल्या आहेत. यामध्ये ११ दहशतवाद्यांना ठार केले आहे. अनंतनाग जिल्ह्यामध्ये अवंतीपोरा भागात भारतीय लष्कराने २ दहशतवाद्यांना ठार केले होते. तर दुसरीकडे, पंजगाममध्ये हिजबुलचे ३ दहशतवादी ठार केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat